ताह्या बाळाच्या ओढीने आईला लागेना झोप; दत्तक दिलेले बाळ परत मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका

ताह्या बाळाच्या ओढीने आईला लागेना झोप; दत्तक दिलेले बाळ परत मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका

बाळाच्या ओढीने रात्री झोप लागत नाही. बाळ झोपले असेल ना. दुधासाठी रडत नसेल ना, असे विविध विचार वारंवार मनात येतात. माझे बाळ मला परत द्या. दत्तक प्रक्रिया रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका एका महिलेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

अॅड. वर्षा भोगले यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली आहे. न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. दत्तक प्रक्रियेसाठी भरून दिलेला अर्ज दोन महिन्यांत मागे घेण्याची तरतूद आहे. अर्ज भरून दोन महिने झालेले नाहीत. ही प्रक्रिया रद्द करून बाळ परत देण्याचे आदेश न्यायालयाने बाल कल्याण समितीला द्यावेत, अशी मागणी अॅड. भोगले यांनी केली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने समितीला याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

औषध घेऊनही दूध थांबत नाही कदाचित बाळ उपाशी असेल!

याचिकाकर्ती 23 वर्षीय सिंगल मदर आहे. मार्च 2024मध्ये तिची प्रसूती झाली. त्यानंतर ती आशा सदन निवारागृहात होती. बाळ दिवसभर झोपलेले असते. रात्री जागे असते. बाळ अवघे दोन महिन्यांचे आहे. त्याला दुधाची गरज आहे. आशा सदनमध्ये बाळाची काळजी घेतली जात असेल का? त्याला वेळेवर दूध मिळत असेल का? ते रडतंय का? या विचारांनी मला रात्रभर झोप लागत नाही. दूध बंद होण्याचे औषध घेतले. तरीही दूध थांबत नाही. कदाचित माझे बाळ उपाशी असेल, अशी या महिलेची भावना आहे.

काय आहे प्रकरण

याचिकाकर्ती महिला पनवेल येथे राहते. दुबईत कामाला असताना वरिष्ठांनी तिचा लैंगिक छळ केला. तेथून ती भारतात परतली. गरोदर असल्याचे सुरुवातीला कळले नाही. पोटाच्या व्याधीसाठी डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला. तेव्हा सहा महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी तिला धक्का बसला. महिला जे.जे. रुग्णालयात गेली. प्रसूती झाल्यानंतर ती आशा सदन येथे गेली. तेथे तिने बाळ दत्तक देण्यासाठी अर्ज भरला. नंतर तिने निर्णय बदलला. बाळ परत देण्याची विनंती केली. तिला कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगितले. आशा सदन व समितीच्या कार्यालयात तिने फेऱया मारल्यानंतर अखेर बाळ परत मिळवण्यासाठी याचिका दाखल केली.

बाळाला बाथरूममध्ये ठेवतात, आशा सदनवर गंभीर आरोप

प्रसूतीनंतर मला आशा सदनने खूप आधार दिला. तेथील काही कर्मचारी चांगले आहे. पण बाळांची काळजी घेणाऱया काही मावशींचे वर्तन योग्य नाही. रात्रपाळीला असणाऱया मावशी त्यांना नीट झोपता यावे म्हणून रडणाऱया बाळांना त्या बाथरूममध्ये ठेवतात, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मावशी बाळांची नीट काळजी घेत नाहीत. माझ्या बाळाची मला सतत काळजी वाटते, अशी भीती महिलेने याचिकेत व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;