83 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात; वैद्यकीय अहवाल सादर, 11 जूनला पुढील सुनावणी

83 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात; वैद्यकीय अहवाल सादर, 11 जूनला पुढील सुनावणी

83 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने वडिलांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले होते. या वैद्यकीय चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर झाला आहे.

न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेकर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर हा अहवाल सादर झाला. वडील बेशुद्ध आहेत. ते आर्थिक व्यवहार हाताळू शकत नाहीत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे कठीण आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वडिलांचा पालक नियुक्ती करण्यास परवानगी देणारे सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निकालही मुलीने खंडपीठासमोर सादर केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी 11 जून 2024पर्यंत तहकूब केली. सुट्टी संपल्यानंतर दैनंदिन कोर्टासमोरच या याचिकेवर अंतिम सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण

अदिती अमोद केतकर यांनी ही याचिका केली आहे. त्यांचे वडील प्रभाकर पटवर्धन यांना कर्करोग आहे. 7 एप्रिल 2024 रोजी त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यांची काळजी मी घेते. कारण आईचेपण वय झाले आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. ते एका पुनर्विकास प्रकल्पाचे प्रमोटर आहेत. त्यांच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता आहे. पुनर्विकास प्रकल्प व अन्य मालमत्तेचे व्यवहार हाताळण्यासाठी मला वडिलांचा पालक म्हणून नेमावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याची नोंद करून घेत न्यायालयाने वडिलांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश जे.जे. रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार तीन तज्ञ डॉक्टरांचे पॅनल तयार करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;