आजोबा-नातवाची ताटातूट करणाऱया जावयाला दणका; कोर्टात हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट बजावणार

आजोबा-नातवाची ताटातूट करणाऱया जावयाला दणका; कोर्टात हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट बजावणार

न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही आजोबा-नातवाची भेट घडू न देणाऱया जावयाला उच्च न्यायालयाने बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट बजावू, असा इशारा सुट्टीकालीन खंडपीठाने दिला आहे.

61 वर्षीय आजोबा जयराज वापीकर यांनी अॅड. रवी जाधव यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जावई राकेश राठोडविरुद्ध अवमान याचिका केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. नियमित खंडपीठाच्या आदेशानुसार जावयाने आपल्या मुलाची आजोबांशी भेट घडवून देणे व त्या भेटीसंबंधी हमीचे पालन केल्याचे कोर्टाला कळवणे बंधनकारक होते, मात्र जावई न्यायालयात हजर राहिलाच नाही. त्यावर आजोबांतर्फे अॅड. रवी जाधव यांनी जोरदार आक्षेप घेतला. जावयाने न्यायालयाचे आदेश वारंवार झुगारले आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अवमान कारवाईचे आदेश देण्याची विनंती अॅड. जाधव यांनी केली. सुट्टीकालीन खंडपीठाने त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेतली आणि बुधवारी कोर्टरूममध्ये व्यक्तिशः हजर राहण्याचे सक्त आदेश जावयाला दिले. त्यानुसार हजर न राहिल्यास जावयाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावू, असा इशारा खंडपीठाने दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;