मतदानाची वेळ गैरसोयीची,वेळेत बदल करा! शिवसेनेचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

मतदानाची वेळ गैरसोयीची,वेळेत बदल करा!  शिवसेनेचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदानाची वेळ ही सकाळी 8 ते दुपारी 4 अशी ठेवण्यात आली आहे. या वेळेत बहुतेक जण हे नोकरीत व्यस्त असतात तसेच खासगी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तींना कंपनी सुट्टी देत नाही. त्यामुळे गैरसोयीची ठरणारी ही वेळ बदलून मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 अशी करावी, मागणी शिवसेना नेते सचिव अनिल देसाई यांनी दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 26 जूनला जाहीर झाली आहे. यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र शिक्षक तसेच पदवीधर असलेले मतदार हे आपापल्या कामाची ठिकाणी व्यस्त असतात. त्यामुळे सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवल्यास मतदाराला सकाळी कामावर जाण्याआधी किंवा संध्याकाळी कामावरून आल्यानंतरही मतदान करता येईल. त्यामुळे मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि मतदानाची टक्केवारीही आपोआप वाढेल. त्यामुळे सर्वांना गैरसोय ठरणारी ही वेळ बदलून मतदारांना दिलासा द्यावा. याबाबत नव्याने वेळापत्रक काढून ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना नेते-सचिव अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;