अनधिकृत होर्डिंग म्हाडाच्या रडारवर
होर्डिंग कोसळून घाटकोपर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर म्हाडाला जाग आली असून लवकरच म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत होर्डिंग हटवण्यात येणार आहेत. घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेनंतर म्हाडातर्फे तातडीने आपल्या जागेवरील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले. येत्या आठवडाभरात हा अहवाल सादर होणार असून त्यातून म्हाडाच्या जागेवर किती अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग आहेत याची माहिती मिळेल. त्यानंतर अनधिकृत होर्डिंगवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. होर्डिंग म्हाडाच्या जागेवर असले तरी त्यासाठी म्हाडाची एनओसी घेऊन पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List