Photo – पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरुन घसरली, वाहतूक विस्कळीत

गुजरातहून मुंबईकडे जात असताना पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे पाच ते सहा डबे घसरले आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामध्ये काहीडबे घसरले आहेत तर काही पूर्णपणे पलटी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र अपघातात मोठं नुकसान झाले असून तिथला इलेक्ट्रिक पोलही पडला आहे. मालगाडीचे डबे पूर्वव्रत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगाने काम सुरु आहे. मात्र मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन विस्कळीत झाल्या आहेत.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List