टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण? BCCI चं ठरलं! लवकरच घोषणा होण्याची शक्यता
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार यावरुन बऱ्याच चर्चा समाज माध्यामांवर रंगल्या. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण BCCI आणि माजी खेळाडू गौतम गंभीर यांच्यामध्ये तसा करार झाल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे.
सनराझर्स हैदराबादला नमवत IPL 2024 चा किताब कोलकाता नाईट राडर्सने आपल्या नावावर केला. तब्बल दहा वर्षांनी कोलकाताच्या संघाने आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली. कोलकाताच्या या विजयामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती गौतम गंभीरने. कारण गौतम गंभीरकडे कोलकाताच्या मेंटॉर पदाची मोठी जबाबदारी होती. आयपीएल दरम्यान गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा सर्व समाज माध्यमांवर रंगत होती. आता क्रिकबझने एका दिलेल्या वृत्तात मोठा दावा करण्यात आला आहे. आयपीएलची फायनल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (27 मे 2024) बीसीसीआय सचिव जय शहा आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली, असे क्रिकबझने म्हटले आहे.
गौतम गंभीरने प्रशिक्षक पदासाठी अर्ज दिला होता का? याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र बीसीसीआय गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक करण्यासाठी आग्रही आहे. तसेच गौतम गंभीर सुद्धा टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List