‘ही’ वाहिनी येतेय नव्या रूपात…; मालिकांमध्ये येणार नात्यांना नवा बहर

‘ही’ वाहिनी येतेय नव्या रूपात…; मालिकांमध्ये येणार नात्यांना नवा बहर

मराठी मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असतात. झी मराठीवरील मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता या वाहिनीत मोठा बदल होतो आहे. झी मराठी ही वाहिनी आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या रुपासह झी मराठी आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा! झी मराठी बहरतेय नव्या अवतारात!, या ब्रीद वाक्यासह झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीच्या लोगोचा रंग बदलला आहे. केसरी रंगाच्या लोगोसह झी मराठी आता घराघरात पोहोचणार आहे.

आता नव्या रूपात…

झी मराठीने आजवर प्रेक्षकांच्या कौटुंबिक भावना, प्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे आणि हे नातं आणखी दृढ करण्यासाठी झी मराठी 27 मे 2024 पासून एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर आली. पुन्हा एकदा झी मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करण्यासाठी आणि चाफ्याचा सुगंध पसरवण्यासाठी सज्ज आहे.

प्रेक्षकांच्या बदलत्या पसंतीसह झी मराठीने आजच्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अश्या नवीन कथा आणल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत, ‘जाऊ बाई गावात’ सारख्या नाविन्यपूर्ण रिऍलिटी शोमुळे प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली. त्यात ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे ‘ या नवीन मालिकांनी भर टाकली.

लक्षवेधक कथा, आकर्षक सेट, उत्तम निर्मितीमूल्य, उत्तम कलाकारांची फौज या सर्वांमुळे प्रेक्षकांना ह्या मालिका आपल्या वाटू लागल्या आहेत. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे, सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं.

दोन नव्या मालिकांची भर

‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणूनच झी मराठीच्या नव्या रुपात भर टाकण्यासाठी नवीन मालिका घेऊन येत आहे. प्रगल्भ अनुभव देणाऱ्या आणखी दोन मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ आणि ‘ड्रामा ज्युनियर्स’ या झी मराठी कुटुंबात लवकरच दाखल होणार आहेत. या मालिकांना कसा प्रसिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;