T20 World Cup 2024 : उपांत्य फेरीत कोणते चार संघ पोहोचणार? सुनील गावस्कार यांनी सांगितलं
IPL 2024 चा हंगाम संपल्यामुळे क्रिडाप्रेमींना आता टी20 वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांच्या संयुक्त यजमानीमध्ये 2 जून पासून वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभुमीवर हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चार संघांची नावे सांगत ‘हे’ संघ उंपात्य फेरीत दाखल होतील असे भाकीत केले आहे.
2 जून पासून टी20 वर्ल्ड कपचा रणसंग्राम सुरू होणार आहे. हिंदुस्थानचा संघ वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तसेच टीम इंडियाचे सर्व साखळी फेरीतील सामने अमेरिकेमध्ये खेळवले जाणार आहेत. अशातच हिंदुस्थानच्या संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघ वर्ल्ड कपच्या उंपात्य फेरीत दाखल होतील, ” अस भाकीत सुनील गावस्कर यांनी केले आहे.
टीम इंडियाचे साखळी फेरीतील सामने 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध, 9 जून रोजी पाकिस्ताविरुद्ध, 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध होणार आहेत. हे सर्व सामने न्युयॉर्कमध्ये खेळवले जातील. तर 15 जून रोजी टीम इंडियाचा साखळी फेरीतील अंतिम सामना कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List