नरेंद्र मोदी वरून टपकले! ‘जन्म बायोलॉजिकल नाही’ विधानाचा राहुल गांधी यांनी पुन्हा घेतला समाचार

नरेंद्र मोदी वरून टपकले! ‘जन्म बायोलॉजिकल नाही’ विधानाचा राहुल गांधी यांनी पुन्हा घेतला समाचार

लोकसभेसाठी मतदान करण्याचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. यानिमित्तानं उत्तर प्रदेशात सर्वच पक्षांच्या दणदणीत सभा सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे प्रचार सभेत बोलताना काँग्रेस राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या ‘माझा जन्म बायोलॉजिकल नाही’ या विधानाचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींनी आपला जन्म बायोलॉजिकल नसून परमात्म्यानं पृथ्वीवर पाठवल्याचं विधान केलं होतं. त्याविधानाचा राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, बंधू भगिनींनो नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलाखतीत आपला जन्म बायोलॉजिकल नाही, तर परमात्म्यानं आपल्याला पाठवलं आहे असं विधान केलं आहे. म्हणजे ते इतरांसारखे आईवडिलांच्या उदरातून जन्मले नाहीत तर आकाशातून टपकले आहे. त्यांना ‘त्यांच्या परमात्म्यानं’ शेतकरी, मजुर, श्रमिक यांच्या मदतीसाठी नाही तर अंबानी आणि अदानींना मदत करण्यासाठी पाठवलं आहे. पण खरंच ‘परमात्मा’ने त्यांना पाठवलं असतं तर त्याने मोदींना सांगितलं असतं की गरीब, मजुर, श्रमिकांची मदत कर. मात्र मोदींना ‘त्यांच्या परमात्मा’ने पाठवलं आहे जो त्यांना अदानी अंबानींना मदत करण्यास सांगतो. हिंदुस्थानची सगळी विमानतळं, रेल्वे, पावर प्लांट अदानी अंबानींना दे, असं त्यांच्या परमात्मा सांगतो, असा कसा त्यांचा परमात्मा आहे? असा वार राहुल गांधी यांनी केला आहे.

तसेच येणाऱ्या 4 जून रोजी देशातून मोदींची सत्ता नष्ट होऊन INDIA आघाडीचं, जनतेचं राज्य येईल असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

दरम्यान. या आधी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी सडकून टीका केली होती आणि देवापुढे हातच जोडले होते. ‘आम्ही आता देवाला प्रश्न विचारतो. अरे देवा, असा माणूस कसा रे पाठवलास? पंतप्रधान आजकाल बरळत सुटलेत. असे कोणी सामान्य माणूस बोलला तर त्याला थेट वेडय़ाच्या डॉक्टरकडे नेले जाईल’, असा जबरदस्त टोला देखील राहुल यांनी लगावला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;