Pune Porsche Case : अजित पवार धादांत खोटं बोलले, त्यांची नार्को टेस्ट करा; अंजली दमानियांचा मोठा दावा
पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी मोठा दावा केला आहे. तसेच अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्के टेस्ट करण्याची मागणी केली आहे. यामुळे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना केलेल्या फोनमुळे अजित पवार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी आरोपी बिल्डर पुत्र वाचवण्यासाठी आयुक्तांना फोन केल्याचा आरोप होतोय. यावर आता अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. ‘अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत अजित पवार फार वेगळे होते. त्यांनी थेट पुण्याच्या मुद्द्यावर बोलायला होवं होतं. पण ते इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत बसले. ज्या पद्धतीने ते बोलले आपण सर्वांनी पाहिले. त्यांची देहबोली गांगरल्यासारखी होती. ते धादांत खोटे बोलत होते. जो प्रश्न मी मांडला होता त्यावर उत्तर द्यायला त्यांना चार दिवस का लागले? कालचा त्यांचा तोरा पाहता ते धादांत खोटे बोलत होते. त्यांची नार्को टेस्टही झाली पाहिजे. त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे’, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात पालकमंत्र्यांचा कंट्रोल खूप आहे. पुण्यातील दगड माती धोंडे घ्यायचे असले तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घ्यावे लागतात. ससून रुग्णालय किंवा पोलीस यंत्रणा सगळीकडे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे अजित पवारांचा फोन जप्त झाला पाहिजे. मग ते कोणी असो उपमुख्यमंत्री का असेना…, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
पुण्यातील ससून रुग्णालय बनलेय ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List