17 वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेस 1 जुनपासून प्रारंभ

17 वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेस 1 जुनपासून प्रारंभ

ड्रीम स्पोर्ट्स 17 वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार असून देशभरातील अव्वल 8 संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेची अंतिम लढत 7 जून रोजी मुंबई येथील कूपरेज फुटबॉल मैदानावर रंगणार आहे. हिंदुस्थानातील क्रीडा तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ड्रीम स्पोर्ट्स अंतर्गत असलेल्या ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने 17 वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या मान्यतेखाली 1 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान भारतातील प्रमुख सहा फुटबॉल हब असलेल्या ठिकाणी या स्पर्धेच्या विभागीय फेऱ्या पार पडल्या.

यामध्ये देशभरातून 37 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. आयएसएल व आय-लीगमधील एआयएफएफ मान्यताप्रत अकादमींचा यात समावेश होता. या लीगमधील विजेते संघ(शिलॉंग व गोवा येथील उपविजेते संघ) यांनी मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. सहभागी आठ संघांमध्ये ईस्ट बंगाल एफसी, मुंबई सिटी एफसी, फुटबॉल 4 चेंज, लाह बेट एफसी, राउंडग्लास पंजाब एफसी, चेन्नईन एफसी, एफसी गोवा, डेम्पो एससी यांचा समावेश आहे.

फुटबॉल चाहत्यांना या सामन्यांचे थेट प्रक्षेपण फॅनकोड मोबाईल ऍप, टीव्ही ऍप, अमेझॉन फायर टीव्ही स्टिक, जिओ एसटीबी, सॅमसंग टीव्ही, एअरटेल एक्स्ट्रीम, ओटीटी प्ले, जिओ टीव्ही, जिओ टीव्ही प्लस, प्राईम व्हिडीओ चॅनल अथवा https://www.fancode.com या संकेत स्थळावर देखील पाहता येणार आहे. देशांतर्गत फुटबॉलसाठी फॅनकोड हे प्रसिद्ध असून याआधी त्यांनी हिरो सुपर कप, आय-लीग, गोवा प्रोफेशनल लीग यांसारख्या स्पर्धांचे देखील प्रक्षेपण केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;