स्वत:ला अवतार म्हणणाऱ्या मोदींचा सफाया होणार; लालू प्रसाद यादव यांचा टोला

स्वत:ला अवतार म्हणणाऱ्या मोदींचा सफाया होणार; लालू प्रसाद यादव यांचा टोला

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. मी जन्म घेतलेला नाही. मी तर अवतार आहे. मला विशेष कार्यासाठी देवाने पाठवले आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा लालूप्रसाद यादव यांनी समाचार घेतला आहे. मोदी तुम्हाला निकालानंतर सर्व काही कळेल. आता समजून जा मोदी गेले. 4 जून नंतर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार, असा दावाही केला आहे.

मिसा भारतीच्या प्रचारासाठी लालू यादव मंगळवारी फुलवारीशरीफ येथे आले आहेत. मिसा पाटणाच्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी लालू प्रसाद यादव माध्यमांशी संवाद साधला. 4 जून रोजी देशात इंडिया आघाडीचे सरकार बनेल. नरेंद्र मोदी यांना त्यादिवशी कळेल. मोदी स्वत:ला अवतार म्हणतात, ते म्हणतात मी जन्म घेतलेला नाही, असा टोलाही लालू प्रसाद यादव यांनी लगावला.

महाविकास आघाडीचे सरकार बनेल. नरेंद्र मोदींचा सफाया निश्चित आहे. संविधान वाचवा, देश वाचवा, असे ही लालू प्रसाद यादव म्हणाले. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान आहे. आजारी असल्यामुळे लालू यादव निवडणुकीत शारीरिकदृष्ट्या फारसे सक्रिय दिसत नव्हते, मात्र आज ते स्वतः मैदानात उतरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;