गुरमीत राम रहिमची रंजीतसिंग हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता; सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द

गुरमीत राम रहिमची रंजीतसिंग हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता; सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिमवर दखल असलेल्या रंजीतसिंग हत्याप्रकरणी हरयाणा उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. गुरमीत राम रहीमसह पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. राम रहिमने सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करत हायकोर्टाने हत्याप्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता केली. 22 वर्षांपूर्वीच्या या खटल्यात 19 वर्षानंतर न्यायालयाने राम रहिमसह 5 जणांची मुक्तता केली आहे.

बलात्कार आणि दोन जणांच्या हत्येसह अनेक आरोप रामरहिवर आहेत. या प्रकरणी तो तुरुंगात आहेत. रंजीत सिंगच्या हत्येप्रकरणी 2009 मध्ये सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिम आणि इतर 4 जणांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, 18 ऑक्टोबर 2021 रोजी न्यायालयाने राम रहिमसह इतर चौघांना रंजीत सिंह हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासंदर्भाने, राम रहिमने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, हायकोर्टाने राम रहिमसह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपी अवतार सिंह, कृष्णलाल, जसबीर सिंह आणि सबदिल सिंह यांचीही न्यायालायने शिक्षेतून मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, एका आरोपीचा कोर्ट ट्रायल सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. बलात्कार आणि पत्रकार हत्या प्रकरणात राम रहिमची याचिका उच्च न्यायलयात अद्याप प्रलंबित आहे. सध्या राम रहिम रोहतक येथील तुरुंगात आहे.

2002 साली डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्य असलेल्या रंजीत सिंहची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस तपासावर नाराज असलेल्या रंजीत सिंहच्या मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. सीबीआय तपासात राम रहिमसह 5 आरोपींना दोषी ठरवून सीबीआय न्यायालायने शिक्षा सुनावली होती. 2007 मध्ये कोर्टाने आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले होते. सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरोधात रामरहिमने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी पाचजणांसह त्याची निर्दोष मुक्तता झाल्याने त्याला दिलासा मिळाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;