अजित पवार गट भाजपचे पटेना! आमच्या पक्षाच्या बैठकीत काय बोलावे, हा आमचा प्रश्नच भुजबळांनी भाजपला सुनावले

अजित पवार गट भाजपचे पटेना! आमच्या पक्षाच्या बैठकीत काय बोलावे, हा आमचा प्रश्नच भुजबळांनी भाजपला सुनावले

लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना महायुतीत सर्व आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पूर्ण झाले नसतानाच अजित पवार गट आणि भाजपमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन जुंपली आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आम्हाला विधानसभा निवडणुकीसाठी 80 ते 90 जागा पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर भाजप नेते सुधार मुनगंटीवार यांनी पलटवार करत भुजबळ यांना सुनावले आहे. त्यावर पुन्हा एकदा प्रत्युत्तर देत भूजबळ यांनी भाजपला सुनावत आपल्या विधापासून युटर्न घेतला आहे.

लोकसभेचे जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपाबाबत काही मागणी असेल, तर ती मीडियाच्या माध्यमातून होत नाही. यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात. अशा प्रकारचे धुके निर्माण करण्यात काहीही अर्थ नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर देत म्हटले होते. त्यावर भुजबळांनी पुन्हा एकदा भाजपला सुनावले आहे.

या मुद्द्यावरून राजकीय वाद करणे योग्य नाही. आमच्या पक्षाची बैठक सुरू होती. त्यामध्ये आम्ही काय बोलावे हा आमचा प्रश्न आहे, असे भुजबळांनी भाजपला सुनावले आहे. आम्ही महायुतीमध्ये येणार होतो. त्यावेळी आम्हाला खासदारकी आणि आमदारकीच्या जागा सांगितल्या होत्या. त्यावेळी जी चर्चा झाली त्याची आठवण मी करून दिली. पुन्हा कमी जागा मिळाल्यावर वाद नके म्हणून काळजी घ्या असे मी सांगितले, असा युटर्नही भुजबळ यांनी घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;