मिझोरममध्ये मोठी दुर्घटना, दगडाच्या खाणीत भूस्खलनामुळे 10 मजुरांचा मृत्यू
मिझोरममधील ऐझॉल शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. दगडाच्या खाणीत भूस्खलनामुळे 10 मजूरांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण मजूर ढिगाऱ्याखाली अडकले आहेतय सध्या या अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शोध मोहिम सुरु आहे.
बंगालच्या उपसागरात रेमल या चक्रिवादळामुळे पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि मिझोरममध्ये हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे मिझोरममधील ऐझॉल शहरात मेल्थम आणि हिमेनच्या सिमेवरील एका दगडाच्या खाणीत भूस्खलन झाल्याची मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास घटना घडली.
10 died after stone quarry collapsed in Mizoram’s Aizawl amid cyclone Remal aftermath
Read @ANI Story | https://t.co/fWjC0zD2ei#Mizoram #Aizawl #CycloneRemal #DGP #IMD pic.twitter.com/qyWvjNM6Oc
— ANI Digital (@ani_digital) May 28, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List