देशातील 37 शहरांतील पारा 45 पार
पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील म्हणजेच देशातील एकूण सहा राज्यांतील 37 शहरांमध्ये रविवारचे तापमान 45 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. शनिवारी या शहरांची संख्या केवळ 17 होती. परंतु अवघ्या एका दिवसात ही संख्या दुप्पट वाढल्याने जिवाची नुसती काहीली झाली आहे. घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. बाहेर पडल्यानंतर नुसत्या घामाच्या धारा वाहत आहेत. राजस्थानमधील फलोदी हे सलग दुसऱया दिवशी 49.8 अंशांसह देशातील सर्वात उष्ण शहर राहिले. ते सरासरीपेक्षा 6.8 अंश जास्त होते. एक दिवस आधी शनिवारी दिवसाचे तापमान 50 अंशांवर गेले होते. रविवारी संपूर्ण राजस्थानमध्ये तापमान 43 अंशांपेक्षा जास्त राहिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List