तेलंगणात पावसाचा कहर
तेलंगणात रविवारी मध्यरात्री पावसाने धुमाकूळ घातला. वेगवान वाऱयासह आलेल्या जोरदार पावसामुळे 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याची राजधानी हैदराबादसह अनेक जिह्यांत वादळी वाऱयासह पावसाने हजेरी लावली. सुसाट वाऱयामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी वीज गायब झाली. टॉवरला फटका बसला. एकटय़ा नगरकुर्नूल जिह्यात 7 बळी गेले. मेडक, रंगारेड्डी, मेडचल मलकाजगिरी आणि नलगोंडा जिह्यात मोठे नुकसान झाले आहे. मोटरसायकलवर जात असलेल्या दोघांवर झाड पडल्याने यात दोघांचाही मृत्यू झाला. महबूबनगर, जोगुलाम्बा-गडवाल, वानापर्थी जिह्यात नुकसान झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List