रोहयोच्या कामावर बोगस मजूर दाखवून लाटले शासनाचे पैसे, गावकऱ्यांची दोषींवर कारवाईची मागणी
रोजगार हमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील खैरलांजी येथील उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना माहिती होताच खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असुन दोषी रोजगार सेवकावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात सध्या रोजगार हमीची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शेतीची कामे नसल्याने ग्रामीण भागात रोजगार राहत नाही. म्हणून शासनाच्या वतीने रोजगार हमीची कामे सुरू केली जातात. गावातच रोजगार उपलब्ध झाला तर नागरिकांचा पलायन थांबतो. मात्र याच रोजगार हमीच्या कामाला गालबोट देखिल लागल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावात पांदण रस्तचे काम सुरू करण्यात आले. गावातील मजूर याच कामावर जाऊ लागले मात्र रोजगार सेवकांनी आपल्याच ओळखीच्या नात्यातील 11 लोकांची बोगस हजेरी लावली. हे नागरीक कामावर आलेच नाही. मग त्यांचे नाव हजेरी बुक वर दिसून आलें. याची माहिती होताच गावातील नागरिकांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत दोषींवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List