कलाकारांचा कौतुक सोहळा; कोकणात संगीत नाटकांची परंपरा जिवंत

कलाकारांचा कौतुक सोहळा; कोकणात संगीत नाटकांची परंपरा जिवंत

कोकणातील दुर्गम गावात राहून काही सच्चा कलाकारांनी संगीत नाटकांची परंपरा जिवंत ठेवली आहे. गुहागर तालुक्यातील वाघांबे गावातील हे कलाकार आहेत. त्यांचे ‘संगीत जय जय गौरीशंकर’ नाटक पाहण्याची संधी मुंबईकर रसिकांना मिळणार आहे. 1956 साली सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी बांधिलकी स्वीकारून परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे ही संस्था स्थापन झाली. संस्थेची उत्सवाची परंपरा सुमारे 150 वर्षांपासून अखंडित सुरू आहे. संस्थेच्या ‘संगीत सुवर्णतुला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत जय जय गौरीशंकर’ नाटकांना पारितोषिक मिळाले आहे.

या सगळय़ाचे श्रेय इतक्या दुर्गम भागात दोन-तीन तास प्रवास करून, घर आणि आणि कामधंदा सांभाळून, उन-पावसाची पर्वा न करता, बॅटरीच्या प्रकाशात रात्ररात्र तालीम करून पुन्हा सकाळी आपल्या कामाला लागणाऱया सर्वांचे आणि प्रामुख्याने पॅप्टन ऑफ द शीप… घनःश्याम जोशी यांचे. या सगळय़ांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत 31 मे रोजी रात्री 8.30 विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात ‘संगीत जय जय गौरीशंकर’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या वेळी मूळ नाटकाचे लेखक, संगीतकार दिवंगत विद्याधर गोखले, यांची पुढची पिढी म्हणजे शुभदा दादरकर, विजय गोखले  अभिनेते पंडित रामभाऊ मराठे यांचे पुत्र मुपुंद मराठे उपस्थित राहणार आहेत. ‘संगीत जय जय गौरीशंकर’ नाटकाला अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा प्रायोगिक संगीत नाटकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;