स्लीम करणाऱया औषधांमुळे लकवा
झटपट वजन कमी करण्याच्या नादात लोक वाट्टेल ती औषधे घेतात. मात्र ही औषधे आपल्या शरीराला किती हानीकारक ठरू शकतात, हे अमेरिकेतील एका अभ्यासातून दिसून आलंय. जलदगतीने वजन कमी व्हावे म्हणून ‘वेगोवी’ आणि ‘ओझेम्पिक’सारखी औषधे घेतली जातात. या औषधांमुळे पोटाचा अर्धांगवायू व अन्य दुष्पपरिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. पोटाचा लकवा मारल्यावर वजन कमी होते, शरीर कुपोषित होऊन गुंतागुंत निर्माण होते आणि मग सर्जरीसारखे उपाय करण्याची वेळ येते. अमेरिकेत झालेल्या अभ्यासातून असे दिसून आलंय की, जीएलपी अॅगोनिस्ट 1 मधील ‘वेगोवी’ आणि ‘ओझेम्पिक’ ही औषधे घेतल्यानंतर अॅबडोमिनल पॅरालिसीसचा धोका 30 टक्के वाढला (ज्यांनी ही औषधे घेतली नाहीत, त्यांच्या तुलनेत). अभ्यासाअंतर्गत मधुमेह आणि लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त तीन लाखांहून अधिक जणांचे विश्लेषण करण्यात आले. त्यामधील 1 लाख 65 हजार लोक जीएलपी अॅगोनिस्ट 1 औषध घेत आहेत. हिंदुस्थानात या औषधांच्या कायदेशीर वापरास परवानगी नाही. खरं तर ही दोन्ही औषधे मधुमेहावरील औषध म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र त्यांच्या वापरामुळे वर्षभरात 10 ते 15 टक्के वजन कमी होते, असा दावा करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List