अंधेरीतील गोखले-बर्फीवाला पूल जोडणीचे काम 30 जूनपर्यंत पूर्ण होणार
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची उंची ही पश्चिमेला सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी जोडण्याचे काम वेगाने सुरू असून जून महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाने आज स्पष्ट केले.
बर्फीवाला पूल हा गोखले पुलाच्या उंचीसोबत जोडण्याच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली कामे प्रगतिपथावर आहेत. सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) तसेच वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांच्याद्वारे आरेखित केला गेला. या दोन्ही संस्थांच्या समन्वयातून जोडणीचे काम सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List