धरणांमध्ये बुडून मुंबईतील दोघांचा मृत्यू
इगतपुरीतील अळवण आणि वैतरणा धरणात पोहताना मुंबईतील दोन पर्यटक बुडाल्याची घटना रविवारी घडली. काळाचौकीतील सिद्धेश गुरव (23) हा मित्रांसोबत रविवारी अळवण धरणावर फिरण्यासाठी आला होता. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. दुसरी घटना वावी हर्ष येथील वैतरणा धरणाच्या पाटामुळे तयार झालेल्या धबधब्यावर संध्याकाळी घडली. अंधेरीचे जलतरणपटू मोफद्दीन सेफुद्दीन हरहरवाला (48) हे नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाणी सोडलेले असल्याने डोहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. ही माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले.
सोमवारी दोन्ही ठिकाणी पोलीस प्रशासन, स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी शोध सुरू केला. या दोन्ही ठिकाणी पात्र खोल असल्याने शोधण्यात अडचणी येत गेल्या. रेस्क्यू पथकही मदतीला हजर झाले होते. दुपारनंतर झारवड बुद्रुक भागात गुरवचा मृतदेह सापडल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List