मुंबईतील धारावीत अग्नितांडव, लाकडी साहित्यामुळे आग वाढली, 6 जखमी
मुंबईतील धारावी येथे लाकडी साहित्याला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले. लाकडी साहित्य आणि फर्नीचर असल्याने आग झपाट्याने पसरली. या आगीत 6 जण जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
धारावी परिसरातील काला किला येथील अशोक मिल कंपाऊंडमध्ये पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास तीन मजली आणि चार मजली इमारतींमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही आग तीन आणि चार मजली इमारतींमध्ये लागली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. लाकडी साहित्य आणि फर्नीचरमुळे आगीने रौद्ररुप धारण केले.
Mumbai, Maharashtra | 6 people injured in a fire broke out at Dharavi. 10 fire tenders reach the spot. Fire is confined to wooden material and furniture, in partly ground plus upper three floored and partly ground plus four floored structure: BMC
— ANI (@ANI) May 28, 2024
या आगीत 6जण जखमी झाले असून सलमान खान (26 वर्षे) हे 8 ते 10% भाजले आहेत. मनोज (26 वर्षे) हे 8 ते 10 टक्के भाजले आहेत..अमजद (22 वर्षे) हे 40 ते 45% भाजले आहेत.सल्लाउद्दीन (28 वर्षे) 40 ते 50% भाजले आहेत. सैदुल रहमान (26 वर्षे) हे 35 ते 40% जळाले आहेत. तर रफिक अहमद (26 वर्षे) यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्यावर, उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईतील धारावी येथे भीषण अग्नीतांडव; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल #Dharavi #Fire pic.twitter.com/vMV49dI0sH
— Saamana (@SaamanaOnline) May 28, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List