नालेसफाईला दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना 55 लाखांचा दंड; वांद्रे, जुहूतही कारवाई

नालेसफाईला दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना 55 लाखांचा दंड; वांद्रे, जुहूतही कारवाई

पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाई पूर्ण केल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवर दिसत असले तरी अनेक नाले अजूनही तुंबलेलेच आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून वांद्रे आणि जुहू येथे नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या दोन पंत्राटदारांना नुकताच प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत हलगर्जी पंत्राटदारांवर केलेल्या दंडात्मक कारवाईचा आकडा आता 55 लाखांवर गेला आहे.

पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून  आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण असणारी नालेसफाई परिणामकारक करण्याचे निर्देश पंत्राटदारांना देण्यात आले आहेत. तर दिरंगाई करणाऱ्या पंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई पिंवा काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या भागात पाणी तुंबेल त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंत्राटदारांसह अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने कामात दिरंगाई करणाऱ्या पंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवातही केली आहे. नालेसफाईच्या कामाची आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडून सतत झाडाझडती घेतली जात आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणे कंत्राटदारांना चांगलेच महागात पडले आहे.

असा ठोठावला दंड (लाखांत)

शहर 31 लाख 65 हजार

पूर्व उपनगर 12 लाख 55 हजार

पश्चिम उपनगर 10 लाख 48 हजार

एकूण दंड 54 लाख 68 हजार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;