कोस्टल रोडच्या भुयारी मार्गात गळती; महापालिका अधिकाऱ्यांनी केलीपाहणी
मुंबईत पाऊस सुरू झाला नाही तरीही मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या भुयारी मार्गातून आज गळती सुरू झाली. भुयाराच्या एका भिंतीच्या एक्सपॅनशन जॉईंटमधून (सांध्यांमधून) गळती झाली. त्यामुळे वरळी ते मरीन ड्राइव्ह या मार्गिकेचा भुयारी मार्गाने होणार प्रवास सुरक्षित आहे का, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. दरम्यान, पाणी गळतीचा प्रकार समोर येताच पालिकेचे अधिकारी व पंत्राटदारांनी घटना स्थळाची पाहणी केली.
पालिकेने 14 हजार कोटी खर्च करून 10 किमीचा कोस्टल रोड उभारला आहे. या मार्गात 2 किलोमीटरचे दोन बोगदे आहेत. त्यातील वरळी ते मरीन ड्राइव्ह या सुरू केलेल्या मार्गिकेमधील एका बोगद्यातील एका सांध्यामधून पाणी गळती होत असल्याचे आढळले.
बोगद्याला तडे नाहीत, गळतीही नाही, बोगदा सुरक्षित
वरळी ते मरीन ड्राइव्ह या मार्गात असलेला बोगदा हा सुमारे जमिनीपासून 15 ते 30 मीटर खाली आहे तसेच जिथून पाणी झिरपते आहे ती बाजू समुद्राच्या अगदी जवळ आहे. मात्र ही गळती नाही तसेच बोगद्याला तडेही गेलेले नाहीत. विशिष्ट केमिकल्सचा वापर करून पाण्याचे झिरपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कोस्ट रोडची ही मार्गिका वाहतुकीसाठी सुरक्षित आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List