पावसाळय़ाआधी उघडे मॅनहोल बंदिस्त करा; अतिरिक्त आयुक्तांकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी

पावसाळय़ाआधी उघडे मॅनहोल बंदिस्त करा; अतिरिक्त आयुक्तांकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील सर्व मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षितरीत्या बंदिस्त करा, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सैनी यांनी आज पूर्व उपनगरातील नालेसफाई, रस्ते, मॅनहोल सुरक्षितता याची पाहणी केली. नालेसफाईच्या कामाला वेग द्या आणि कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी आज पालिकेच्या परिमंडळ-6 मधील घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड (एन, एस आणि टी विभाग)  परिसरातील सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर एन विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. यावेळी उप आयुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त अजय पाटणे आदींसह पर्जन्य जलवाहिन्या, घन कचरा व्यवस्थापन विभाग, मलनिःसारण प्रचालन, म्हाडा, मेट्रो, एमआरआयडीसी, वन विभाग, रेल्वे प्राधिकरण आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोडकळीस आलेल्या इमारती, दरडप्रवण क्षेत्राची पाहणी

अतिरिक्त आयुक्त सैनी यांनी एन विभागातील विक्रोळी परिसरातील राम नगर येथील मोडकळीस आलेल्या इमारतींची आणि दरडप्रवण क्षेत्राची देखील पाहणी केली. येथील रहिवाशांमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत जनजागृती करा, असे निर्देश सैनी यांनी अधिकाऱ्यांना दिले.तसेच एन विभागात मलनिŠसारण, पर्जन्य जलवाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी लावलेल्या प्रतिबंधक जाळी तसेच झाकणांचीही पाहणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;