चारशे पारच्या घोषणेमुळे गैरसमज वाढले – प्रफुल्ल पटेल
भाजपच्या अब की बार चारसो पार या घोषणेमुळे जनतेत गैरसमज वाढले आणि त्याचा सामना आम्हाला प्रचारादरम्यान करावा लागला, असे विधान अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज केले. चारशेपार जागा मिळवून भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे, असा प्रचार मोठय़ा प्रमाणात विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यामुळे जनतेत गैरसमज पसरला. लोकांना ते खरेही वाटू लागले. त्यामुळे त्या स्थितीला आम्हाला तोंड द्यावे लागले. एनडीएच्या बैठकीत मी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर भाजप नेतृत्वाकडून सभांमधून स्पष्टीकरण देण्यास सुरुवात करण्यात आली, असे पटेल म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आमची पारंपरिक मते दूर गेली, असे पक्षात सर्वांनाच वाटत असल्याचेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List