अहोरात्र मेहनत घ्या… निवडणुकीपर्यंत सतर्क राहा! सुभाष देसाई यांचे शिक्षक सेनेच्या सदस्यांना आवाहन
शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक सेनेच्या संघटकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, अहोरात्र मेहनत घ्यावी आणि शिक्षक मतदारांपर्यंत आपल्या उमेदवारांची आश्वासक आणि सकारात्मक प्रतिमा पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करा, असा सल्ला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिला.
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 26 जूनला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई शिक्षक मतदारसंघातील पूर्वतयारीचा आणि प्रचार व्यवस्थेचा आढावा घेण्याकरिता शिवसेना भवनात शिक्षक सेना विभाग संघटकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सुभाष देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिक्षक सेनेच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. आतापर्यंतच्या मतनोंदणीबद्दल आणि प्रचार व्यवस्थेबद्दल माहिती दिली. मतदार शिक्षकांशी नियमित संपर्प, भविष्यात शिक्षण व्यवस्थेत आपल्या उमेदवाराच्या माध्यमातून होऊ शकणारे आमूलाग्र बदल आणि मजदानाच्या दिवशी मतदारांची सुनिश्चित करायची उपस्थिती याबाबत शिक्षक सेनेने सुयोग्य नियोजन करावे, असे राऊत म्हणाले. या वेळी उमेदवार ज.मो. अभ्यंकर यांनी आजपर्यंतचा कार्यअहवाल सादर केला. जालिंदर सरोदे, अजित चव्हाण, प्रकाश शेळके, पैलास गुंजाळ, उमा डेरे, आलम खान, विजय गवांदे यांनी पूर्वप्रचार कामाबाबत माहिती दिली. मुरलीधर मोरे यांनी संचालन तर जगदीश भगत यांनी आभार प्रदर्शन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List