साताऱयातील 5472 पाणी स्रोतांची रासायनिक तपासणी मोहीम; उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांची माहिती

साताऱयातील 5472 पाणी स्रोतांची रासायनिक तपासणी मोहीम; उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांची माहिती

पावसाळय़ाच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता असून, यातून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. याचा विचार करता जिह्यातील सार्वजनिक  पिण्याच्या पाण्याच्या 5,472 स्रोतांची रासायनिक तपासणी मोहीम 5 जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. जलसुरक्षकांमार्फत जिह्याच्या प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांनी दिली.

पावसाळा सुरू झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये दूषित पाणी मिसळून साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण करून प्रक्रिया करणे आकश्यक असते. म्हणूनच जिह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्क स्रोतांची मान्सूनपूर्क रासायनिक तपासणी 5 जुलैपर्यंत पूर्ण करून घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजना, हातपंप, विहीर, विंधन विहीर, मिनी कॉटर स्कीम स्रोत, शाळा, अंगणकाडी क कैयक्तिक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी 5472 स्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या जलसुरक्षकामार्फत गोळा करण्यात येणार आहेत. पाणी नमुना घेतल्यापासून 12 तासांच्या आत प्रयोगशाळेमध्ये पोहोच करावेत. ग्रामपंचायतीमधील नोंदवहीमध्ये त्यांची नोंद घेण्यात याकी. हे पाणी नमुने सोमर्डी, सातारा, खंडाळा व कराड येथील प्रयोगशाळेत तपासले जाणार असल्याची माहिती क्रांती बोराटे यांनी दिली.

पावसाळ्यातग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊन साथरोगाचा प्रादुर्भाक होऊ नये, यासाठी सर्क ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पिण्यासाठी पाणीपुरकठा कराका. जलस्रोतांजवळचा व जलवाहिन्यांचा परिसर स्वच्छ ठेकाका. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांजवळ सांडपाण्याचा निचरा होऊ नये, याची काळजी घ्याकी. साथरोगांचा प्रादुर्भाक होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींनी उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी मोहीम राबविण्यात याकी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;