मुंबई विभागात शून्य कॉपी; निकाल 2.17 टक्क्यांनी वाढला
On
दहावीच्या निकालात मुंबई विभागाच्या सुरू असलेल्या घसरणीला यंदाच्या वर्षी ब्रेक लागला आहे. मुंबई विभागाच्या दहावीचा निकाल यंदा 95.83 टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकाल तब्बल 2.17 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई विभागाच्या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे यंदा एकही कॉपी प्रकरण या विभागात आढळून आलेले नाही. राज्याच्या एकूण निकालात मुंबई विभाग यंदा चौथ्या स्थानी आहे.
एकूण 3 लाख 39 हजार 269 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 3 लाख 25 हजार 143 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल मुंबई उपनगर 2 चा लागला असून सर्वाधिक निकाल रायगड जिह्याचा 96.75 टक्के इतका लागला आहे. ग्रेडनिहाय निकालावर नजर टाकल्यास 97,354 विद्यार्थी डिस्क्टिंगशनमध्ये, 1 लाख 18 हजार 6 विद्यार्थी प्रथम श्रेणी, तर 83, 542 द्वितीय श्रेणी, 26, 241 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे. मुंबई विभागातील 1533 शाळांचा निकाल 100 टक्के तर 5 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर 8 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
यंदाही मुंबई विभागातून मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा परीक्षेला बसलेल्या 1 लाख 73 हजार 68 मुलींपैकी 1 लाख 65 हजार 601 मुली उत्तीर्ण झाल्या असून एपूण टक्केवारी 95.68 टक्के आहे. तर या तुलनेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 92.21 टक्के इतके आहे. यात परीक्षेला बसलेल्या 1 लाख 88 हजार 520 मुलांपैकी 1 लाख 73 हजार 849 जण उत्तीर्ण झाले आहेत. तर 14 हजार 671 मुले नापास झाली आहेत. यांना जुलैमध्ये होणाया पुरवणी परीक्षेत परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.
मुंबईतील गुणवंत
90 टक्केपेक्षा जास्त गुण – 13,430
85 ते 90 टक्के – 21,541
80 ते 85 टक्के – 28,819
75 ते 80 टक्के – 33,976
70 ते 75 टक्के – 37,557
65 ते 70 टक्के – 70,394
60 ते 65 टक्के – 43,607
45 ते 60 टक्के – 88,803
45 टक्क्यांहून कमी – 32,290
जिल्हानिहाय निकाल
दक्षिण मुंबई : परीक्षेला बसले 28,131, उत्तीर्ण 27,060, टक्केवारी 96.19
मुंबई उपनगर : परीक्षेला बसले 1 56,398, उत्तीर्ण 54,202, टक्केवारी 96.10
मुंबई उपनगर :परीक्षेला बसले 2 44,476, उत्तीर्ण 42,200, टक्केवारी 94.88
ठाणे : परीक्षेला बसले 1,13,403, उत्तीर्ण 1,08,378, टक्केवारी 95.56
रायगड : परीक्षेला बसले 35,727, उत्तीर्ण 34,568, टक्केवारी 96.75
पालघर : परीक्षेला बसले 61,134, उत्तीर्ण 58,735, टक्केवारी 96.07
खासगी विद्यार्थ्यांचा निकाल 78.57 टक्के
मुंबई विभागातून 17 नंबरचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांचा निकाल 78.57 टक्के इतका लागला आहे. 14 हजार 532 खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 11 हजार 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही रायगड जिह्याने आघाडी घेतली असून जिह्याचा निकाल 89 टक्के लागला आहे. तर कमी निकाल दक्षिण मुंबईचा असून केवळ 70.55 टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
दहावीच्या निकालानंतर मानसिक दडपणाखाली असणाऱया विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने समुपदेशन सेवा कार्यान्वित केली आहे. राज्य मंडळाने काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थी हेल्पलाईनवर संपर्प साधू शकतात, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.
चित्रकलेसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण
दहावीच्या परीक्षेत यंदा तब्बल 1 लाख 78 हजार 865 विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला आहे. यातील सर्वाधिक 1 लाख 28 हजार 199 विद्यार्थ्यांना चित्रकला विषयातील विशेष प्रावीण्यासाठी सवलतीचे गुण मिळाले आहेत. तसेच नृत्य 1589, गायन 2940, वादन 1151, लोककला 11,311, नाटय़ 7, क्रीडा 32,963, एनसीसी 24, स्काऊट-गाईड 647 विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहे.
कांजूर मार्ग येथील सरस्वती विद्यालयाचा 100 टक्के निकाल
कांजूर मार्ग येथील सरस्वती शिक्षण प्रसारक समितीच्या सरस्वती विद्यालय या मराठी माध्यम शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. मागील 45 वर्षांपासून शाळेने 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदा परीक्षेला बसलेल्या 112 विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. सुशांत होडगे या विद्यार्थ्याने 96 टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर आर्या चव्हाण, नेहा शेटकिंदे, रिया पालव या विद्यार्थिनींना 94 टक्क्यांहून अधिक गुण आहेत. मुलींमध्ये याही वर्षी 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱयांची संख्या अधिक आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष बाबा कदम, कार्यवाह विजय तोडणकर, रमेश कोचरेकर, मुख्याध्यापक नानासाहेब पुंदे, भाऊसाहेब घाडगे यांनी अभिनंदन केले आहे.
145 कॉपी, 200 गैरप्रकार
दहावीच्या परीक्षेत एपूण 145 कॉपी प्रकार उघडकीस आले. त्यापैकी सर्वाधिक प्रकार छत्रपती संभाजीनगरात घडली. येथे 86 कॉपी प्रकरणे आढळून आली. तर पुणे 19, नागपूर 16, नाशिक 6, लातूर 6, अमरावती 7, कोकण 1 आणि मुंबई, कोल्हापुरात एकही कॉपी प्रकरण सापडले नाही. दहावीच्या परीक्षेदरम्यान विविध विभागात एपूण 299 गैरप्रकार समोर आले.
आजपासून गुणपडताळणी अर्ज करता येणार
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 28 मे ते 11 जून या कालावधीत विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. गुणपडताळणीसाठी प्रतिविषय 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रतिविषय 400 रुपये भरावे लागणार आहेत.
हेल्पलाईन क्रमांक
7387400970
9011184242
8421150528
8263876896
8369021944
8828426722
7387647902
9011302997
98814182368
9359978315
मागील चार वर्षांचा निकाल
2020 95.30
2021 99.95
2022 96.94
2023 93.83
2024 95.81
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List