मुंडेवाडी व्हायरल व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल; पोलीस अधीक्षकांनी घेतली गावकऱयांची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हय़ात निर्माण झालेला जातीय कलह अजूनही धुमसत आहे. मुंडेवाडीतील एका व्हिडीओने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत अत्यंत विखारी आवाहन करण्यात आले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुंडेवाडीत तातडीने बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. व्हिडीओत व्यक्त झालेले मत हे एका व्यक्तीचे असून संपूर्ण गावाचा त्याला पाठिंबा नसल्याचा दावाही ठाकूर यांनी केला. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओने राज्यभरात खळबळ उडाली. या व्हायरल व्हिडीओमुळे पोलीसही चक्रावून गेले. जातीय संघर्षाचे हे लोण इतरत्र पसरू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तातडीने मुंडेवाडी गाठून ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत शांतता, सलोख्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी व्हिडीओत व्यक्त करण्यात आलेले मत हे वैयक्तिक असल्याचे सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List