सत्तेसाठी मोदी, भाजपा काहीही करतील
मोदींसह सर्व भाजप नेत्यांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे कोणत्याही किमतीत सत्ताप्राप्ती. यासाठी ते भ्रष्ट व्यवहार करतात, आमदारांना लाच देतात आणि देवाच्या नावाने लोकांची दिशाभूल करतात, असा दावा प्रियांका गांधी कांगडा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आनंद शर्मा यांच्यासाठी चंबा येथे आयोजित एका सभेत केला.
हिमाचलमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस सरकार पाडण्यासाठीही मोदींनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अशा नेत्याला पसंती देणार का, असा सवालही प्रियांका गांधी यांनी जनतेला केला.
हिमाचलमधील राजकीय गोंधळाबद्दल बोलताना प्रियंका यांनी फुटीर आमदारांना भाजपने प्रत्येकी 100 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला. रात्री चोरांसारखे लपवून त्यांना चंदीगडमधील हॉटेलमध्ये नेले गेले, असे त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List