टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये डेरेदाखल

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये डेरेदाखल

वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये 2 जूनपासून टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा ‘रन’संग्राम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पहिला जत्था न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी हिंदुस्थानी संघ न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्याचा फोटो शेअर केला.

हिंदुस्थानी संघातील काही खेळाडू व सपोर्ट स्टाफ 25 मे रोजी मुंबई विमानतळावरून न्यूयॉर्कला रवाना झाले होते. आता 1 जूनला टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळून न्यूयॉर्कमधील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. हिंदुस्थानी संघासोबत कर्णधार रोहित शर्मासह संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेदेखील इतर खेळाडूंसोबत गेले आहेत. टीम इंडियाचा दुसरा जत्था सोमवारी (दि. 28) वर्ल्ड कपच्या स्वारीवर रवाना झाला.

कोहली, हार्दिक, सॅमसन उशिरा दाखल होणार

स्टार खेळाडू विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पंडया व यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हे तीन खेळाडू थोडे उशिराने टीम इंडियात दाखल होणार आहेत. या तिघांनीही ‘बीसीसीआय’ची परवानगी घेऊन संघात थोडे उशिराने दाखल होण्याचे नियोजन केले आहे.

आयर्लंडविरुद्धच्या लढतीने वर्ल्ड कपचा श्रीगणेशा

यजमान अमेरिका व पॅनडा यांच्यातील लढतीने 2 जूनला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा प्रारंभ होणार आहे. मात्र हिंदुस्थानी संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहे.

हिंदुस्थानचा टी-20 वर्ल्ड कप संघ

n रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडया (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज n राखीव ः शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंह, आवेश खान.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;