म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी रखडली; पावसाळय़ात रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागणार 

म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी रखडली; पावसाळय़ात रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागणार 

दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मुंबईतील मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते, मात्र पावसाळा तोंडावर येऊनही अद्याप धोकादायक इमारतींची यादी जाहीर झालेली नसल्यामुळे पावसाळय़ात धोकादायक इमारतीत रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

शहरात म्हाडाच्या सुमारे 16 हजार उपकरप्राप्त इमारती आहेत. दरवर्षी पावसाळय़ापूर्वी या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या  इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. इमारती अतिधोकादायक असतील तर त्या तत्काळ रिकाम्या करून रहिवाशांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जाते, मात्र पावसाळा तोंडावर येऊनही अद्याप धोकादायक इमारतींची यादी जाहीर झाली नसल्यामुळे पावसाळय़ात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

निवडणुकांच्या कामाचा सर्वेक्षणाला फटका  

म्हाडाचे अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले होते. त्यामुळे धोकादायक इमारतीच्या सर्वेक्षणाच्या कामाला उशीर झाला आहे. येत्या आठवडय़ाभरात आम्ही धोकादायक इमारतींची यादी जाहीर करू, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;