IPL 2024 : मिचेल स्टार्क निवृत्ती घेणार? अंतिम सामन्यानंतर केले मोठे वक्तव्य

IPL 2024 : मिचेल स्टार्क निवृत्ती घेणार? अंतिम सामन्यानंतर केले मोठे वक्तव्य

कोलकाताविरुद्ध हैदराबाद या अंतिम सामन्यात हैदराबादचा पराभव करण्यामध्ये मिचेल स्टार्कची महत्वाची भुमिका होती. त्यामुळेच त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले. सामना सपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्याने निवृत्ती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्टेलिया संघाचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाताने तब्बल 24.75 कोटी रुपयांना खरेदी करत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा मान दिला. विशेष म्हणजे क्वालिफायर 1 आणि अंतिम सामन्यात त्याच्या भेदक माऱ्यामुळे हैदराबादच्या मुख्य फलंदाजांचा निभाव लागला नाही. त्यामुळे कोलकाताच्या संघाने हैदराबादचा पराभव केला. क्वालिफायर 1 मध्ये 34 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट आणि अंतिम सामन्यात 14 धावा देत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. त्यामुळे दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताला विजय मिळवून देण्यात स्टार्कची गोलंदाजी महत्वाची ठरली. अंतिम सामना झाल्यानंतर पत्रकारांशी स्टार्कने संवाद साधला.

“गेल्या 9 वर्षांपासून मी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला सर्वाधिक प्राधान्य देत होतो. आयपीएल सारख्या लीगपासून मी दुर राहिलो. कारण मला माझ्या शरीराला आराम द्यायचा होता. तसेच मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळायची. पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मला कोणत्या तरी एका फॉरमेटमधून निवृत्ती घ्यावी लागले,” असे म्हणत स्टार्कने एकदिवसीय, कसोटी किंवा टी-20 यापैकी एका फॉरमेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सुचक वक्तव्य केले आहे.

“मला वाटतं पुढच्या एकदिवसीय विश्वचषकाला अजून बराच वेळ बाकी आहे. जर मी यापासून लांब राहिलो, तर माझ्यासाठी फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याची दार उघडी होतील. मी या हंगामाचा (IPL 2024) मनसोक्त आनंद लुटला. टी20 विश्वचषक येत आहे. त्याआधी आयपीएल खेळणे खूप फायदेशीर होते,” अस स्टार्क म्हणाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;