पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात सत्ताधारी आमदार-मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘- विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात सत्ताधारी आमदार-मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘- विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

पुण्यातील हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार, मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘ असल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता हे समोर येत आहे. ज्या डॉक्टरांनी या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलले त्याला ससून रुग्णालयात अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात यावी. असे शिफारस पत्र अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी लिहून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली होती.

वडेट्टीवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस केलेले पत्र शेअर करत पुणे हिट अँड रन प्रकरणावरून संताप व्यक्त करत टीकास्त्र डागले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिफारस पत्र लिहून पदावर बसवण्यात येत आहे. राजकीय पाठबळ असल्यामुळेच नियम आणि कायदे धाब्यावर बसवून निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या आरोपींना वाचवण्या इतकी ह्या अधिकाऱ्यांची हिंमत होत आहे,” असे वडेट्टीवार यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;