हजार शत्रू चालतील पण अशी पत्नी…, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

हजार शत्रू चालतील पण अशी पत्नी…, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

हजार शत्रू चालतील पण अशी पत्नी…, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये फक्त क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, नताशा हिने इन्स्टाग्रामवरून ‘पांड्या’ हे नाव देखील हटवलं आहे. शिवाय हार्दिक याच्यासोबत असलेले फोटो देखील नताशा हिने डिलिट केलेत. ज्यामुळे दोघांच्या घटस्फोटाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय हार्दिक पांड्या याच्या संपत्तीमध्ये 70 टक्की हिस्सा नताशा हिचा असल्याचा देखील दावा करण्यात येत आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

सोशल मीडियावर चाहते दोघांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक्सवर एका युजरने भलीमोठी पोस्ट करत हार्दिक – नताशा यांच्या नात्यावर मत व्यक्त केलं आहे. ‘आजच्या जगात लग्न फक्त एक जबाबदारी म्हणून पाहा… एक उत्सव म्हणून लग्नाकडे पाहू नका… पांड्याने स्वतःच्या लग्नाकडे उत्सव म्हणून पाहिली आणि गोष्टी अधिक कठीण झाल्या…’

 

 

दुसरीकडे, इन्स्टाग्रामवरून हार्दिक पांड्याचे आडनाव काढून टाकल्यानंतर नताशा स्टॅनकोविचला खूप ट्रोल केलं जात आहं. एका यूजरने तिच्या फोटोवर कमेंट करत अपशब्दही वापरले. हजार शत्रू मिळाले तरी चालतील, पण अशी पत्नी नको…, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘पांड्या की कहानी अजब निराली, शादी से पहले बच्चा शादी के बाद तलाक, धोखा खा गया पांडू भाई।’

सांगायचं झालं तर, रडिट युजरने दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा देखील केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक – नताशा एकत्र राहात नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

हार्दिक – नताशा यांचं लग्न

हार्दिक – नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर मे 2020 नताशा – हार्दिक यांनी कोर्ट मॅरिज केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर नताशा हिने मुलाला जन्म दिला. नताशा – हार्दिक यांच्या मुलाचं नाव अगस्त्य असं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;