चंद्रपुरात उष्णतेचा कहर; ब्रम्हपुरी शहरात उच्चांकी 47.1 अंश तापमानाची नोंद

चंद्रपुरात उष्णतेचा कहर; ब्रम्हपुरी शहरात उच्चांकी 47.1 अंश तापमानाची नोंद

महाराष्ट्रासहीत देशभरात उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आज (27 मे 2024) विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळाला. एकिकडे मुंबईतले वातावरण आज दिवसभर ढगाळ होते. मात्र दुसरिकडे चंद्रपूर जिल्ह्यतील ब्रम्हपूरी शहरामध्ये 47.1 अंश तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर हे विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरले आहे. ब्रम्हपुरी शहरात आज 47.1 अंश तापमनाची नोंद करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरलं, तर दुसरीकडे चंद्रपूर शहरामध्ये 44.8 अंश तापमान नोंदवले गेले. या दोन्ही शहरातील तापमानांचा विचार केला तर, चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी या दोन्ही शहरांचे आजचे तापमान या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान ठरले. या भयंकर उष्णतेमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड गर्मीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ब्रम्हपुरी शहरही चांगलेच तापत आहे. येत्या 31 मे पर्यंत हिटवेव अशीच कायम राहणार असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;