ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेर्यांचे डिस्प्ले बंद
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी निवडणूक पार पडली. त्यानंतर आता 4 जून रोजी निकालाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे चार डिस्प्ले काही मिनिटांसाठी बंद पडल्यामुळे खळबळ उडाली. मात्र यामागील कारण जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी नंतर स्पष्ट केले.
जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कळवली. त्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीजपुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेरेचे डिस्प्ले बंद झाल्याचे सांगून त्यांनी सर्व ३६ सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List