Hardik Pandya : लग्नात ‘जूते चुराई’ वेळी हार्दिक दिले होते लाखो रुपये, आकडा ऐकाल तर…
टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या एका वाईट पॅचमधून जात आहे. आयपीएलमधील खराब फॉर्मनंतर आता त्याचं पत्नी नताशासोबत वाजल्याचं आणि त्यांच्या घटस्फोटच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मात्र, या बदद्ल नताशा किंवा हार्दिक दोघांकडूनही जोडप्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेल नाही, ना ते या विषयावर काही बोलले आहेत. हार्दिकने 2020 मध्ये नताशा स्टॅनकोविचसोबत लग्न केले होते. या जोडप्याला अगस्त्य हा तीन वर्षांचा मुलगाही आहे.
तर लग्नानंतर पुन्हा तीन वर्षांनी त्यांनी राजस्थानमध्ये लग्न केलं होतं. हार्दिक-नताशाने 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. या लग्नसोहळ्याला काही खास पाहुणे आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. त्यांच्या संसारामध्ये सध्या काह आलबेल नाहीये अशी चर्चा सुरू असतानाचा, राजस्थानमधील त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जूते चुराईच्या विधीच्या हार्दिकने त्याच्या मेव्हण्यांना मोठी रक्कम दिली होती. चपला परत मिळाव्यात म्हणून हार्किवे चक्क पाच लाख रुपय देण्याचे कबूल केले. त्यावर अनेक लोकांनी बऱ्याच कमेंट्सही केल्या.
व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले
व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर लोकांनी भरमसाठी कमेंट्स दिल्या. हार्दिक नातशाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, हार्दिकने व्याजासह 5 लाख वसूल करावेत. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, “हार्दिक भाईबद्दल खूप वाईट वाटतंय. ” “लोक कधी बदलतात हे तुम्हाला कळतही नाही, ” अशी कमेंटदेखील आणखी एका युजरने केली आहे.
कोण आहे नताशा स्टेनकोविक ?
नताशा स्टॅनकोविक एक सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हार्दिक नताशाची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. यानंतर हार्दिकने नताशाला लाइफ पार्टनर होशील का विचारत प्रपोज केले. त्यांच्या मुलाचा अगस्त्य पांड्याचा जन्म 30 जुलै 2020 रोजी झाला. मात्र गेल्या काही काळापासून हार्दिक-नताशामध्ये सगळं काही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक – नताशा एकत्र राहात नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही. आधी नताशा तिच्या नावापुढे पंड्या आडनावही लावायची, पण आता तिने सोशल मीडिया अकाऊंटवरून ते आडनावही काढून टाकलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List