Amitab Bachchan : काव्या मारनच्या डोळ्यातले अश्रू बिग बींना पाहवेना, म्हणाले – माय डिअर…

Amitab Bachchan : काव्या मारनच्या डोळ्यातले अश्रू बिग बींना पाहवेना, म्हणाले – माय डिअर…

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स सनराइजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रविवारी संध्याकाळी IPL 2024 चा अंतिम सामना झाला. मात्र या सामन्यात शाहरूखच्या KKR टीमने SRH संघावर 8 विकेट्स राखून सहज विजय मिळवला आणि IPLच्या ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरलं. कोलकाता संघाच्या या विजयानंतर शाहरुख आणि त्याचे कुटुंबिय तसेच केकेआरचे चाहते जल्लोष करताना दिसले. शाहरुखने स्टेडिअममध्ये फेरी मारत चाहत्यांचे आभारही मानले. मात्र एकीकडे त्यांचा जल्लोष सुरू अतानाच हैदराबादची टीम मात्र पराभवामुळे दु:खात होती. आणि हैदराबाद संघाची मालक काव्या मारन हिला तर अश्रू अनावर झाले होते. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे बिग बी, अर्थात अमिताभ बच्चन यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून तिच्या डोळ्यातले अश्रू बिग बी यांना काही पहावले नाहीत. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही या घटनेचा उल्लेख करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

काव्या मारनचे अश्रू पाहून बिग बींना वाटलं वाईट

IPL 2024 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर शाहरुख खानच्या KKR टीमला शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. सनरायझर्स संघाच्या पराभवामुळे अमिताभ बच्चन देखील निराश झाले. या सामन्याबाबत त्यांनी ब्लॉगवर पोस्ट लिहीली. त्याच पोस्टमध्ये त्यांनी काव्या मारन हिच्यासाठी काही ओळी लिहील्या आहेत. ‘आयपीएल फायनल संपली आणि केकेआरने शानदार विजय मिळवला. SRH संघ पराभूत झाला. हा पराभव निराशाजनक आहे कारण हैदराबादचा संघ चांगला आणि त्यांनी इतर सामन्यांमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते. ‘

काव्या मारनबद्दल काय म्हणाले बिग बी ?

याच पोस्टमध्ये अमिताभ यांनी काव्या मारन हिचाही उल्लेख केला. ‘ सगळ्यात दु:खद आणि वाईट गोष्ट म्हणजे हैदराबादच्या पराभवानंतर त्या संघाच्या मालकीणीच्या डोळ्यात आलेले अश्रू.. पराभवामुळे इमोशनल होऊन तिचं रडणं. कॅमेऱ्याकडे पाठ करून तिने तिचे अश्रू आणि इमोशन्स लपवले. (ते पाहून) मला तिच्यासाठी खूप वाईच वाटलं !पण काही हरकत नाही, उद्याचा आणखी एक ( नवा) दिवस आहे.. माय डिअर! ‘ असे अमिताभ बच्चन यांनी नमूद केले.

केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय खूपच आनंदात होते. पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांना मिठी मारून शाहरुखने आनंद व्यक्त केला. त्याचा हा व्हिडीओ देखील बराच व्हायरल झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;