कोकण-कन्या सुस्साट! दहावीच्या निकालातही मुलींची बाजी; कोकण विभाग अव्वल

कोकण-कन्या सुस्साट! दहावीच्या निकालातही मुलींची बाजी; कोकण विभाग अव्वल

मे महिन्याच्या शेवटाला प्रतीक्षा असते ती बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची. गेल्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागला असून त्यात मुलींनी बाजी मारली आहे. तर आज 10 वीचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा मुलींनीच आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला असून कोकण विभागानं बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे. यंदा राज्यातील 187 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. लातूर विभागातील सर्वाधिक 123 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.01 टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी 94.73 टक्के लागला. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. 94.56 टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, 97 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी 93.83 टक्के निकाल लागला होता. त्यामुळे यंदा निकाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागातून 99.01 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के लागला आहे. निकालांमध्ये 97.21 टक्के विद्यार्थिनी उत्तिर्ण झाल्या असून 94.56 टक्के विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारल्याचं चित्र आहे. एकूण 72 विषयांपैकी 18 विषयांचा 100 टक्के लागला आहे.

दरम्यान, दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे.

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

पुणे : 96.44 टक्के
नागपूर : 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
मुंबई : 95.83 टक्के
कोल्हापूर : 97.45 टक्के
अमरावती : 95.58 टक्के
नाशिक : 95.28 टक्के
लातूर : 95.27 टक्के
कोकण : 99.01 टक्के

इथं पाहा 10 वीच्या निकाल:

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org/

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;