हे बिहार आहे; झारखंड किंवा दिल्ली नाही, एकदा हात लावून तर पहा! तेजस्वी यादव यांचा मोदींवर पलटवार

हे बिहार आहे; झारखंड किंवा दिल्ली नाही, एकदा हात लावून तर पहा!  तेजस्वी यादव यांचा मोदींवर पलटवार

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी ‘बिहारला लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकणार’, असे विधान केले होते. याचा तेजस्वी यादव यांनी चांगलाच समाचार घेतला.

पंतप्रधान मोदी आता धमकी आहेत. पण हे बिहार आहे, झारखंड किंवा दिल्ली नाही. एकदा हात तर लावून पहा, बिहारची लोकं गुजराती लोकांना घाबरत नाहीत. बिहारची लोकं कोणालाही घाबरत नाहीत. आमच्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मच तुरुंगात झालेला आहे. पण आता 75 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती 34 वर्षाच्या तरुणाला धमकी देतोय. तुम्ही पराभूत केले तर तुम्हाला तुरुंगात टाकू म्हणताहेत. मात्र आता जनताच तुमचा फैसला करणार आहे, असा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला.

देशाला त्रास देणे थांबवा, तुमचे मंदिर बांधू; ममता बॅनर्जी यांचा मोदींना टोला

पंतप्रधान मोदी बिहारला आले होते. 10 वर्षात काय केले याचा हिशेब ते देतील असे वाटले होते. पाच वर्षात काय काय करतील याबाबत बोलतील असे वाटले होते. पण 75 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती 34 वर्षाच्या तरुणाला तुरुंगात टाकण्याची भाषा करत आहे. ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात एकदा नाही तर तिनदा चौकशी झाली आहे. आता फक्त राजकीय फायद्यासाठी चौथ्यांदा कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही, असेही तेजस्वी यादव म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;