देशाला त्रास देणे थांबवा, तुमचे मंदिर बांधू; ममता बॅनर्जी यांचा मोदींना टोला

देशाला त्रास देणे थांबवा, तुमचे मंदिर बांधू; ममता बॅनर्जी यांचा मोदींना टोला

देवाने आपल्याला विशेष उद्देशाने पाठवले आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. पराभवाच्या भीतीने मोदींचा भ्रमनिरास झाल्याने ते अशी वक्तव्ये करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला होता. आता त्यांच्या या विधानावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींना जबरदस्त टोला लगावला आहे. जर पंतप्रधान मोदी खरोखरच देवाने पाठवल्याचा दावा करत असतील तर लोक त्यांच्यासाठी मंदिर बांधतील. पण मोदींना देशाला त्रास देणे थांबवावे, असा टोला ममता बॅनर्जी यांनी मोदींना लगावला आहे.

मोदी म्हणतात की त्यांचे जैविक पालक नाहीत. देवाने त्यांना पृथ्वीवर विशेष उद्देशाने पाठवले आहे. आपल्या आईचे निधन झाल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत असल्याने ते म्हणाले. तसेच 2047 पर्यंत ते देवाने पाठवलेला दूत म्हणून राहतील, असेही ते म्हणाले होते. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर मोदी खरोखर देव असतील तर ते चांगलं आहे. पण देव राजकारण करत नाहीत. ते लोकांबद्दल वाईट बोलत नाही किंवा दंगलीत त्यांना मारत नाही. खोटंही बोलत नाही, असेही त्या म्हणाल्या.

मी तुम्हाला एक जागा देईन जेणेकरून तुम्ही मंदिर बांधू शकाल आणि तुमचा फोटो ठेवू शकाल. आम्ही तुळशीची पाने देखील अर्पण करू आणि अगरबत्ती लावू आणि पुजारीही नियुक्त करू. मिठाई,फुलेही देऊ. ढोकळा आणि खिचडीचा नैवेद्य देऊ म्हणजे तुम्ही तिथेच बसाल. देवाने खरोखर तुम्हाला पृथ्वीवर पाठवले असेल, तुम्ही देवदूत असाल तर आम्ही तुमचे मंदिर बांधू. मात्र, आता कृपया देशाला त्रास देणे बंद करा. तुमच्या खोटे बोलण्याला मर्यादा असायला हवी. तुमच्या खोटारडेपणाला जनता कंटाळली आहे, असा हल्लाबोलही ममता बॅनर्जी यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;