शाहरुख खानची एका दिवसाची कामाई 10 कोटी, नेटवर्थ जाणून बसणार नाही विश्वास, गंडगंज श्रीमंत आहे अभिनेता

शाहरुख खानची एका दिवसाची कामाई 10 कोटी, नेटवर्थ जाणून बसणार नाही विश्वास, गंडगंज श्रीमंत आहे अभिनेता

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. किंग खान याने आतापर्यंत 90 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्याला 14 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शाहरुख खान असा अभिनेता आहे, ज्याने बॉलिवूडमध्ये मेहनतीच्या जोरावर स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

कुटुंब बॉलिवूडचं नसताना देखील अभिनेत्याने संघर्ष करत स्वतःचं नाव मोठं केलं आहे. ज्यामुळे शाहरुख आज बॉलिवूडचा बादशाह आहे. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांप्रमाणे अभिनेत्याच्या संपत्तीचा आकडा देखील फार मोठा आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान गडगंज संपत्तीचा मालक आहे. गेल्या एक दशकात अभिनेत्याच्या संपत्तीत 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शाहरुख खान व्यवसाय, सिनेमे, जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. किंग खानच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान, आमिर खान देखील मागे आहे.

शाहरुख खान याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, शाहरुख खान जवळपास 760 मिलियन डॉलरचा मालक आहे. म्हणजे भारतील चलनानुसार 6,324 कोटी रुपये… शाहरुख खान एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी मानधन घेतो. पण काही असे सिनेमे देखील आहेत, ज्यासाठी अभिनेत्याने एक रुपया देखील घेतलेला नाही. अभिनेत्याने आलिशान घर आणि एक प्रायव्हेट जेट देखील आहे. अभिनेत्याची दिवसाची कमाई 10 कोटी रुपये आहे.

शाहरुख खान याच्याकडे महागडं घर देखील आहे, मुंबईत अभिनेता कुटुंबासोबत आलिशान घरात राहतो. शाहरुख खान याच्या बंगल्याचं नाव ‘मन्नत असं असून. बंगल्याची किंमत 200 कोटी रिपये असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय अभिनेत्याकडे लंडन आणि दुबईत आलिशान व्हिला देखील आहे.

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनता लेक सुहाना खान हिच्यासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;