केईएममध्ये बंद लिफ्टमुळे रुग्ण, कर्मचाऱ्यांची गैरसोय सात महिन्यांपासून नवीन लिफ्टचे साहित्य पडून
केईएम रुग्णालयात अनेक लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वॉर्डमध्ये अॅडमिट केलेल्या रुग्णांबरोबर नातेवाईकांनाही मोठय़ा मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने नवीन 13 लिफ्टचे साहित्य आणले. मात्र गेल्या सात महिन्यांपासून हे साहित्य धूळ खात पडून आहे.
परळ येथील केईएम रुग्णालयात दररोज 8 हजारांहून अधिक रुग्ण ओपीडीला येत असतात. यात एखाद्या आजाराचे निदान झाले तर त्या रुग्णाला उपचारासाठी दाखल केले जाते. केईएम रुग्णालयात 17 मजली नवीन इमारत असून या इमारतीत अनेक लिफ्ट बंद असल्याने रुग्णांसह कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचीही गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांना रुग्णांना जेवण, कपडे, कचरा, रुग्णांची ने-आण सतत करावी लागते. त्यामुळे सगळ्याचाच खोळंबा होतो.
लिफ्ट बसवण्याचे काम सुरू
साहित्य आणून सात महिने झाल्यानंतरही नव्या लिफ्ट का बसवण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न केईएममध्ये कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. दरम्यान, सध्या 13 लिफ्टपैकी चार लिफ्ट बसवण्याचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने उर्वरित लिफ्ट बसवण्यात येतील, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List