शेतकऱ्यांची 224 एकर जमीन हडपली! मिंधेंच्या महसूल विभागाला हायकोर्टाचा दणका

शेतकऱ्यांची 224 एकर जमीन हडपली! मिंधेंच्या महसूल विभागाला हायकोर्टाचा दणका

हातकणंगले येथील शेतकऱ्यांची 224 एकर जमीन एका कंपनीने दुसऱ्याच कंपनीला परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्थानिक 33 शेतकऱ्यांनी मिंधे सरकारच्या महसूल विभागाविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी शेतकऱ्यांच्या याचिकेचा स्वीकार केला आहे. त्यामुळे महसूल विभागाला दणका बसला आहे.

कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर कल्लापाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्कला विकल्याचा आरोप आहे. याबाबत 2019 मध्ये न्यायालयाने 60 दिवसांची मुदत देऊन महसूल विभागाला निर्णय देण्यास सांगितले होते. तो आदेश महसूल विभागाने अद्याप पाळला नाही, एकही सुनावणी घेतली नाही. विशेष म्हणजे, पेंद्र सरकारचे उपसचिव नरेंद्र सिंग यांनीदेखील पत्र लिहिले होते. त्यानंतरही महसूल विभाग ढिम्म राहिला आहे. राजकीय दबावापोटी सुनावणी लांबवण्याचा प्रकार महसूल विभाग करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. त्यामुळे मिंधे सरकारचे धाबे दणाणले आहे.

नेमके प्रकरण काय?
हातकणंगले तालुक्यातील मजले, तारदाळ परिसरातील 224 एकर शेतजमीन एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला परस्पर विकल्याचा आरोप आहे. तसेच या ठिकाणी अवैध बांधकाम केले जात आहे. कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने 1997-98 मध्ये तीन गावांतील शेतजमीन उद्योग उभारणीसाठी घेतली होती, पण कंपनीने पाच वर्षांत कोणताच उद्योग उभारला नाही. कंपनीने शेतकऱ्यांना नोकरीसह इतर अनेक आश्वासने दिली होती, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता न करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;