कोहली अमेरिकेतील सराव सामन्याला मुकणार; विश्रांतीनंतर वर्ल्ड कपच्या स्वारीवर रवाना होणार
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेनंतर मला थोडी विश्रांती हवी असल्याचे कारण सांगत हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली थोडा उशिराने टी-20 वर्ल्ड कपच्या स्वारीवर अमेरिकेला रवाना होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा हा प्रमुख फलंदाज वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या एमकेव सराव सामन्यासही मुकणार आहे.
वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये होत असलेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची पहिली तुकडी 25 मे रोजी रवाना झाली, तर दुसरी तुकडी सोमवार, 27 मे रोजी रवाना होणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने दुबईत वैयक्तिक काम असल्याचे कारण देत बीसीसीआयकडून उशिरा अमेरिकेला पोहोचण्याची परवानगी घेतली आहे. विराट कोहलीलादेखील आयपीएलनंतर छोटीशी विश्रांती हवी आहे. त्यामुळे त्याने उशिरा पोहोचण्याची विनंती केली. त्यामुळे 1 जूनला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात कोहली खेळू शकणार नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विराट कोहलीने उशिरा सहभागी होण्याबाबत आधीच परवानगी मागितली होती. त्यामुळेच बीसीसीआयने त्याचा व्हिसा उशिराने केला आहे. 30 मे रोजी सकाळी तो न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघेल. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि सपोर्ट स्टाम हे टी-20 वर्ल्ड कपसाठी शनिवारी रात्री न्यूयॉर्ककडे रवाना झाले. हिंदुस्थानी संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहे. याचबरोबर कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी टीम इंडिया 9 जूनला भिडणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List