ताडोबात पर्यटकांनी वाघाला घेरले! सरकारी यंत्रणा हादरली, वन्यप्रेमी चिंतेत

ताडोबात पर्यटकांनी वाघाला घेरले! सरकारी यंत्रणा हादरली, वन्यप्रेमी चिंतेत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापनाने डोळय़ावर पट्टी बांधलीय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ताडोबाची सफर करणाऱया अतिउत्साही पर्यटकांनी शनिवारी ‘अतिरेक’ केला. जिप्सीमधून फिरताना कोअर झोनमध्ये एका वाघाला घेरून ठेवले. या धक्कादायक प्रकाराने सरकारी यंत्रणा हादरली आहे, तर वन्यप्रेमींनी ताडोबातील वाघांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

ताडोबामध्ये केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशविदेशातील लाखो पर्यटक हजेरी लावतात. विशेषतः उन्हाळी सुट्टीत मोठय़ा प्रमाणावर पर्यटक ताडोबाची सफर करतात. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त वावरणाऱया वाघांना जवळून पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळतात. मात्र काही पर्यटकांचा अतिउत्साह सध्या चिंतेचे कारण बनला आहे. शनिवारी असाच एका प्रकार घडला. कोअर झोनमधील मोहर्ली ते खटोडा रस्त्यावर वाघ ऐटीत चालला होता. त्याला पॅमेऱयात पैद करण्याचा, नजरेत साठवण्याचा योग आला होता, परंतु पर्यटकांनी उत्साहाचा अतिरेक दाखवला. एकेक करीत अनेक जिप्सी वाघाच्या भोवताली उभ्या राहिल्या. चहुबाजूंनी वाघाचा रस्ता ‘ब्लॉक’ केला. सुदैवाने, यादरम्यान वाघ आक्रमक झाला नाही. जर त्याने हल्ला केला असता तर त्याला जबाबदार कोण होते, असा सवाल उपस्थित होत आहे.

महसुलासाठी वाघाच्या स्वातंत्र्यावर गदा

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन प्रामुख्याने महसूल वाढीसाठी धडपडते. महसुलाचे टार्गेट गाठण्यासाठी वाघाचे स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप करीत वन्यप्रेमींनी व्याघ्र प्रकल्पातील नियमावलीचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे.

नियमांचे सर्रास उल्लंघन

वाघ बघण्याच्या स्पर्धेत पर्यटकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. अशा घटना वारंवार घडूनही ताडोबा प्रकल्पाचे व्यवस्थापन सुस्त आहे. नियम मोडणाऱया एकाही पर्यटकावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;